सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित   

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज (गुरुवारी) प्रस्तावित केलेले मॉक ड्रिल प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. या संदर्भात, सर्व नागरी संरक्षण नियंत्रकांना आणि संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पुढील तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सरकारी आदेशात म्हटले आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार, २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून गुजरात, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हरयाणा आणि चंडीगढसह केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार होते. पण ते पुढे ढकलण्यात आले आहे.

Related Articles